Shruti Vilas Kadam
रोज दोरीच्या उड्या मारल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रवासात हा व्यायाम फायदेशीर ठरतो.
दोरीच्या उड्यांमुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. योग्य आहार आणि नियमित व्यायामासोबत केल्यास शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
हा एक उत्तम कार्डिओ व्यायाम आहे. नियमित दोरीच्या उड्या मारल्याने हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते.
दोरीच्या उड्या मारताना पाय, मांड्या आणि पोटऱ्यांच्या स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
दररोज नियमित सराव केल्याने शरीराची स्टॅमिना आणि सहनशक्ती वाढते. त्यामुळे इतर शारीरिक कामे करताना लवकर थकवा जाणवत नाही.
दोरीच्या उड्या मारताना हात आणि पायांचा समन्वय साधावा लागतो. यामुळे शरीराचा तोल आणि हालचालींमधील समन्वय सुधारतो.
दोरीच्या उड्या मारण्यासाठी जिममध्ये जाण्याची गरज नाही. घरीच ५ ते १० मिनिटे सराव करून चांगला कार्डिओ व्यायाम करता येतो.