ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवसेंदिवस सोशल मीडियाची क्रेझ वाढत चालली आहे. अनेकांना शॉर्ट व्हिडिओज आणि रील्स पाहण्याची सवय लागली आहे.
परंतु तुम्हाला माहितीये का तासनतास रील्स पाहिल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.
रील्स पाहताना कमी वेळात जास्त माहिती मिळाल्याने आपल्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो.
जास्त वेळ रील्स पाहिल्याने एकाग्रतेवर परिणाम होतो. यामुळे कोणतेही काम करताना अडथळा येऊ शकतो.
जास्त वेळ रील्स पाहिल्याने निद्रानाशची समस्या उद्भवू शकते. तसेच इनसोमिया होऊ शकतो.
शॉर्ट व्हिडिओज आणि रील्स पाहण्याच्या सवयीमुळे मेंदूवर परिणाम होतो. जेणेकरुन आपल्या विचारांवर नकारात्मक परिणाम होतो.
सतत रील्स बघितल्याने मानसिक आरोग्य तसेच डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.