Manasvi Choudhary
अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल बघण्याची सवय असते. दिवसभर कामात बिझी राहिल्यानंतर रात्री लाईट बंद केल्यानंतरही अनेकजण रिल्स स्क्रोल करत पाहतात.
मात्र तुम्हाला माहितीये का? अंधारात मोबाईल बघण्याची ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
अंधारात मोबाईल स्क्रीनचा प्रकाश डोळ्यांवर पडल्याने डोळ्यांच्या बाहुल्यांवर ताण येतो यामुळे डोळे कोरडे पडणे, लाल होणे आणि हळूहळू दृष्टी कमजोर होण्याचा गंभीर धोका निर्माण होतो.
मोबाईल स्क्रीनमधून निघणारा ब्लू लाईटमुळे रात्री झोप लागत नाही, निद्रानाशाची समस्या वाढते आणि झोपेचे संपूर्ण चक्र बिघडते.
अंधारात सतत मोबाईलच्या ब्राइट स्क्रीनकडे बघितल्यामुळे मेंदूच्या नसांवर ताण येतो. परिणामी, सकाळी उठल्यावर तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे किंवा मायग्रेनचा त्रास सुरू होऊ शकतो.
रात्री उशिरापर्यंत सोशल मीडिया किंवा स्क्रीनवर स्क्रोल करत राहिल्यामुळे मेंदूला विश्रांती मिळत नाही. यामुळे कोर्टिसोल वाढून मानसिक अस्वस्थता, चिडचिड आणि चिंता वाढते.
मोबाईलच्या हानिकारक प्रकाशामुळे डोळ्यांखाली काळे वर्तुळ येण्याची समस्या वेगाने वाढते. तसेच त्वचेच्या पेशी डॅमेज होऊन चेहरा निस्तेज दिसू लागतो आणि अकाली सुरकुत्या पडू शकतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.