ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुम्ही देखील वॉशिंग मशीन वापरत असाल आणि यात कपडे धुतल्याने खराब होत असतील. तर आजच या चुका टाळा.
वॉशिंग मशीन वेळोवेळी स्वच्छ न केल्यासही कपडे खराब होऊ शकतात.
कपडे धुताना जास्त डिटर्जंट वापरल्याने देखील कपडे खराब होतात.
रंग किंवा कापडानुसार कपडे वेगळे केले नाहीत तरी तुमचे कपडे खराब होऊ शकतात.
जर कपड्यांवरील डाग आधी साफ केला नाही तर त्यामुळे इतर कपडेही खराब होऊ शकतात.
लोक बहुतेक वेळा वॉशिंग मशीनचे गेट बंद ठेवतात, ज्यामुळे कपड्यांमध्ये बुरशी वाढू शकते.
वॉशिंग मशीन ड्रायरचे लिंट फिल्टर साफ न केल्यानेही कपडे खराब होतात.