ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुलांसाठी काही तरी हेल्दी अन् टेस्टी बनवायच आहे, मग उडीद डाळीचे अप्पे नक्की टाय करा.
उडदाची डाळ, तांदूळ, चिरलेला कांदा, किसलेले गाजर, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, काळी मिरी पावडर, लाल मिरचीचे तुकडे, तेल आणि मीठ लागेल
उडीद डाळ आणि तांदूळ चांगले धुवून ३ ते ४ तास भिजत ठेवा.
तांदूळ आणि उडीद डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
या पिठात कांदा, गाजर आणि हिरवी मिरची घाला, तसेच आले आणि कोथिंबीर, काळी मिरी पावडर आणि मीठ घाला.
आता अप्पे बनवणाऱ्या पॅनमध्ये थोडे तेल घाला आणि प्रत्येक अप्पेच्या साच्यात पीठ घाला. ते सोनेरी झाल्यावर दुसऱ्या बाजूने शिजवून घ्या.
गरमागरम उडीद डाळीचे अप्पे तयार आहे. नारळाची चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा.