ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोरड्या मीठाने नव्हे तर पाण्यात मीठ घालून आंघोळ केल्याने एकच नाही तर अनेक फायदे होतात.
मिठामध्ये मॅग्नेशियम असते जे ताण कमी करते.
मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने स्नायूंच्या वेदना कमी होतात.
त्वचेवर हलके मीठ चोळल्याने शरीरातील मृत त्वचा निघून जाते.
मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरात रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे शरीर सक्रिय वाटते.
फक्त सैंधव मीठ किंवा एप्सम मीठाने आंघोळ करा आणि एका बादलीत २ चमचेपेक्षा जास्त घालू नका.
आठवड्यातून दोनपेक्षा जास्त वेळा मिठाच्या पाण्याने आंघोळ करू नका.