ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रॉयल एनफील्डच्या बाईक भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय आहेत. रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ची एक्स-शोरूम किंमत १,९३,०८० रुपयांपासून सुरू होते.
क्लासिक ३५० च्या सर्वात स्वस्त मॉडेलची ऑन-रोड किंमत २.२० लाख रुपये आहे.
क्लासिक ३५० खरेदी करण्यासाठी तुम्हाला २.१० लाख रुपयांचे बाईक लोन मिळेल.
लोनवर बाईक खरेदी करण्यासाठी सुमारे ११,००० रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल. क्लासिक ३५० साठी घेतलेल्या कर्जावर बँक ९ टक्के व्याज आकारू शकते.
जर तुम्ही दोन वर्षांसाठी कर्ज घेतले तर तुम्हाला दरमहा १०,५०० रुपये ईएमआय ९ टक्के व्याजदराने भरावे लागतील.
जर तुम्ही तीन वर्षांसाठी कर्ज घेतले तर दरमहा ७,५०० रुपये ईएमआय बँकेत जमा करावे लागेल.
जर तुम्ही चार वर्षांसाठी बाईकसाठी कर्ज घेतले तर तुम्हाला दरमहा ६,१०० रुपये ईएमआय म्हणून जमा करावे लागतील.