Surabhi Jayashree Jagdish
कोलेस्ट्रॉल वाढणं ही समस्या अनेकदा शांतपणे शरीरात वाढत जाते आणि सुरुवातीला स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. पण काही वेळा चालताना किंवा हालचाली करताना शरीर काही संकेत देऊ लागतं.
चालताना पायांच्या स्नायूंमध्ये अचानक वेदना किंवा कळ येऊ लागते हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचं एक लक्षण असू शकतं. यामध्ये रक्तप्रवाह कमी होतो. थोडा वेळ थांबल्यावर वेदना कमी होतात, पण पुन्हा चालू लागल्यावर ती परत जाणवते.
जर तुम्ही थोडंसं चालल्यानंतरच खूप थकल्यासारखं वाटत असेल, तर हे शरीरात रक्तपुरवठा नीट न होण्याचं संकेत असू शकतं. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही.
चालताना किंवा उभं राहिल्यावर पाय थंड पडल्यासारखं वाटणं किंवा सुन्न होणं हेही एक महत्त्वाचं लक्षण आहे. रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे शरीराच्या टोकांपर्यंत उष्णता पोहोचत नाही. यामुळे पाय थंड पडू शकतात.
जर चालताना किंवा चालून झाल्यावर पायांच्या त्वचेचा रंग फिकट, निळसर किंवा काळसर दिसू लागला, तर हे गंभीर संकेत असू शकतात. रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे त्वचेला योग्य पोषण मिळत नाही.
पायांवर छोटीशी जखम झाली आणि ती बराच वेळ भरून येत नसेल तर हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचं संकेत असू शकतं. कारण रक्तप्रवाह कमी असल्यामुळे जखमेपर्यंत आवश्यक पोषक घटक पोहोचत नाहीत. त्यामुळे जखम भरायला वेळ लागतो.
जर चालताना अचानक श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा दम लागतोय असं वाटत असेल, तर हे हृदयावर ताण येण्याचं लक्षण असू शकतं. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होतात, ज्यामुळे हृदयाला अधिक मेहनत करावी लागते.