Warm Water Intake: थंडीच्या दिवसांत कोमट पाणी पिण्याचे चमत्कारिक फायदे, दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे?

Shruti Vilas Kadam

दिवसातून ६ ते ८ ग्लास पाणी प्या

हिवाळ्यात तहान कमी लागली तरी पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे दिवसातून साधारण ६ ते ८ ग्लास पाणी प्यावे. मात्र, प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगळी असते. त्यामुळे त्यानुसार पाणी प्यावे.

low water intake affects kidney health | Google

कोमट पाणी पिणे चांगला पर्याय

हिवाळ्यात अनेकांना थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी प्यायला आवडते. कोमट पाणी प्यायल्याने आराम मिळतो. त्यामुळे हिवाळ्यात कोमट पाणी हा चांगला पर्याय आहे.

Water Intake | pinterest

सकाळी उठल्यावर पाणी प्या

सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे झोपनंतर शरीराला पाणी मिळते. मात्र, फक्त सकाळीच नाही, तर दिवसभर पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

Water Intake

पचनासाठी पाणी महत्त्वाचे

पुरेसे पाणी प्यायल्याने शरीराचे काम व्यवस्थित चालण्यास मदत होते. यामुळे पोट साफ होण्यासाठी देखील मदत होते. काही लोकांना कोमट पाणी प्यायल्याने बरे वाटते.

Water Intake

शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका

हिवाळ्यात तहान कमी लागली तरी शरीराला पाण्याची गरज असते. त्यामुळे दिवसभर थोडे-थोडे पाणी पीत राहा. लघवीचा रंग फिकट पिवळा असेल, तर शरीराला पुरेसे पाणी मिळत राहिल्याने अशक्तपणा देखील येत नाही.

Water Intake

इतर पदार्थांमधूनही पाणी मिळते

फक्त साधे पाणीच नाही, तर सूप, दूध, फळे आणि भाज्यांमधूनही शरीराला पाणी मिळते. त्यामुळे दिवसभरात या पदार्थांचाही आहारात समावेश करा.

Water Intake

शरीराच्या गरजेनुसार पाणी प्या

व्यायाम केल्यावर, जास्त घाम आल्यावर किंवा ताप आल्यावर शरीराला जास्त पाण्याची गरज भासू शकते. किडनी किंवा हृदयाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किमान २.५ ते ३लिटर पाणी प्यावे.

Water Intake | Google

Madhuri Dixit: धकधक गर्लचा जलवा; माधुरी दीक्षितचा निळ्या साडीतील दिलखेचक लूक व्हायरल

Madhuri Dixit | Saam Tv
येथे क्लिक करा