Saam Tv
कपाट व्यवस्थित करण्यापूर्वी त्यातील सर्व कपडे बाहेर काढा. यामुळे तुमच्याकडे नेमके किती कपडे आहेत आणि कोणत्या गोष्टींची खरोखर गरज आहे हे कळेल.
कपाटात प्रत्येक ऋतूचे कपडे एकत्र ठेवल्यास जागा लवकर भरते. उन्हाळ्यात जड स्वेटर आणि जॅकेट्स वेगळे करून ठेवा. तर हिवाळ्यात वापरात नसलेले हलके कपडे कपाटाच्या वरच्या भागात किंवा इतर ठिकाणी ठेवा.
जे कपडे तुम्ही वारंवार वापरता (उदा. रोजचे कुर्ते, टी-शर्ट, जीन्स किंवा ऑफिसचे कपडे), ते कपाटात अशा ठिकाणी ठेवा जिथे हात सहज पोहोचू शकेल.
सर्व कपडे एकाच जागी ठेवण्याऐवजी त्यांच्या वेगवेगळ्या वर्गीकरण करा.
कपडे खूप कोंबून ठेवल्याने ते लवकर चुरगळतात आणि खराब होतात. टी-शर्ट, टॉप्स आणि हलके कपडे घडी करून ठेवा.
स्वेटर, जॅकेट आणि जाड शाल यांसारखे कपडे जास्त जागा व्यापतात. त्यामुळे त्यांना इतर हलक्या कपड्यांसोबत ठेवण्याऐवजी वेगळ्या भागात ठेवा.
प्रत्येक कपडा हँगरला टांगणे गरजेचे नसते. शर्ट, ब्लेझर, साड्या किंवा ज्या कपड्यांना पटकन सुरकुत्या पडतात त्यांनाच हँगर करुन ठेवा.
कपाट एकदा व्यवस्थित लावल्यानंतर ते पुन्हा विस्कटू न देणे अधिक महत्त्वाचे आहे. कपडा काढल्यानंतर तो पुन्हा योग्य जागी ठेवा.
NEXT : ऑफिस टिफिनसाठी 6 हेल्दी ब्रेकफास्ट आयडिया; मिळेल भरपूर प्रोटीन