Saam Tv
तुम्ही अंडे खात नसाल आणि ऑफिसच्या घाईत प्रोटीनयुक्त नाश्ता काय बनवावा हे सुचत नसेल, तर या 6 सोप्या आणि पौष्टिक नाश्त्याचे पर्याय नक्की ट्राय करा.
हे पदार्थ बनवायला अत्यंत सोपे आहेत, यामुळे भरपूर ऊर्जा मिळते आणि दुपारपर्यंत पोटही भरलेले राहते.
नेहमी ब्रेड टोस्ट करून खात असाल, तर त्यालाच प्रोटीन रिच बनवा. बेसनचे घट्ट पीठ तयार करा. त्यात हळद, मीठ, लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओवा आणि एक चिमूट हिंग टाका. आता ब्रेडचे स्लाईस या पिठात बुडवून तव्यावर किंवा सँडविच मेकरमध्ये शेकून घ्या.
रात्रीच ओट्स दुधात भिजवून ठेवा आणि त्यात थोडे चिया सीड्स टाका. सकाळी त्यात आवडीनुसार फळे (जसे की केळी, सफरचंद किंवा डाळिंब) बारीक चिरून टाका. गोडव्यासाठी त्यात पीनट बटर किंवा मध घालू शकता.
ज्यांना सकाळी काहीतरी चटपटीत खायला आवडते, त्यांच्यासाठी मोड आलेले कडधान्य वापरा. स्प्राउट्समध्ये काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा आणि कांदा बारीक चिरून टाका. वरून हिरवी मिरची आणि लिंबू पिळून खा.
पनीर मॅश करून त्यात चाट मसाला, धणे-जिरे पूड आणि मीठ मिक्स करा. गव्हाच्या मळलेल्या पिठात हे सारण भरून छान पराठा शेकून घ्या.
भिजवलेली मूग डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या. या पेस्टमध्ये थोडे बेसन, मीठ, लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा आणि पनीरचे तुकडे मिक्स करा. हे मिश्रण तव्यावर पसरवून दोन्ही बाजूने शेकून घ्या.
ओट्स रात्रीच दह्यात भिजवून ठेवा. सकाळी त्यात काकडी, कांदा, मीठ आणि भाजलेले जिरे पूड टाकून चविष्ट आणि थंड असा रायत्यासारखा नाश्ता तयार करा.
NEXT : केसांना तेल लावण्याची योग्य वेळ कोणती?