Saam Tv
केसांना तेल लावण्यासाठी कोणती एकच वेळ 'सर्वोत्कृष्ट' आहे, तेल लावण्याची वेळ ही केसांचा प्रकार, वापरत असलेले तेल आणि केसांना किती पोषणाची गरज आहे यावर अवलंबून असते.
तज्ज्ञांच्या मते, शॅम्पू करण्याच्या अर्धा ते दोन तास आधी तेल लावणे पुरेसे असते. एवढ्या वेळेत तेल टाळूवर व्यवस्थित पोहोचते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते.
शॅम्पू करण्यापूर्वी केसांना खोबरेल तेल लावल्यास केसांमधील 'प्रोटीन लॉस' कमी होते.
तुम्ही दिवसा केस धुणार असाल, तर शॅम्पूच्या १-२ तास आधी सकाळी तेल लावणे उत्तम मानले जाते.
रात्रभर डोक्यावर तेल ठेवल्यामुळे काहींच्या टाळूला खाज सुटणे, चिकटपणा वाढणे किंवा डँड्रफ/कोंड्याची समस्या उद्भवू शकते.
केस खूप कोरडे असतील आणि तुटत असतील, तर टाळू सोडून फक्त केसांच्या लांबीवर तेलाचे काही थेंब लावावेत. यामुळे केस मऊ राहतात आणि गुंता होऊन तुटत नाहीत.
ज्यांची टाळू मुळातच तेलकट आहे, त्यांनी जास्त वेळ तेल लावून ठेवू नये. यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते.
केसांना तेल लावण्याची फिक्स वेळ नसते. शॅम्पू कधी करणार आहात आणि तुमच्या केसांचा प्रकारानुसार शॅम्पू करण्याच्या काही तास आधी केसांना तेल लावणे हा उत्तम मार्ग आहे.