Banana vs dates: केळी की खजूर...काय खाणं आरोग्यासाठी बेस्ट, शरीरात काय बदल होतात?

Surabhi Jayashree Jagdish

शरीराला झटपट ऊर्जा देण्यासाठी काय खावं?

खजुरामध्ये नैसर्गिक साखर जास्त असल्यामुळे तो शरीराला पटकन ऊर्जा देतो. थकवा जाणवत असेल किंवा लगेच ऊर्जा हवी असेल तर खजूर खाणं उपयोगी ठरू शकतं. केळ्यामध्ये फायबर असल्यामुळे त्यातून मिळणारी ऊर्जा तुलनेने हळूहळू वापरली जाते.

Dates benefits

पचनासाठी केळी चांगली की खजूर?

खजुरामध्ये फायबर भरपूर असतं. त्यामुळे पोट साफ होण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. केळ्यामध्येही फायबर असतं जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतं. थोडं कच्चं असलेल्या केळ्यामध्ये स्टार्च असतं, जे आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंना पोषण देतं.

Dates nutrition

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर?

केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर असतं, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. खजुरामध्येही पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजं असतात, जी शरीराच्या सामान्य कार्यासाठी महत्त्वाची आहेत.

Dates for energy

रक्तातील साखर

खजुरामध्ये नैसर्गिक साखर जास्त प्रमाणात असते त्यामुळे तो जास्त खाल्ल्यास रक्तातील साखर वाढू शकते. केळ्यामध्ये असलेलं फायबर आणि त्याची पिकण्याची अवस्था यामुळे रक्तातील साखरेवर होणारा परिणाम बदलू शकतो.

Fruits for weight loss

रोजच्या आहारात केळी खावीत की खजूर?

रोजच्या आहारात केळी खाणं हा ऊर्जा, फायबर आणि जीवनसत्त्वं मिळवण्याचा सोपा पर्याय आहे. व्यायामापूर्वी किंवा थकवा जाणवल्यावर झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी खजूर खाता येतात. गोड पदार्थांऐवजी खजूर वापरता येत असले तरी त्यात नैसर्गिक साखर आणि कॅलरी जास्त असल्यामुळे प्रमाणात खाणं महत्त्वाचं आहे.

Banana dietary fiber

सर्वोत्तम पर्याय

केळी आणि खजूर या दोन्ही फळांचे शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात. वजन नियंत्रणात ठेवायचं असेल किंवा रोजच्या खाण्यात पोट भरणारं फळ हवं असेल तर केळी चांगला पर्याय आहे. तर झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी खजूर उपयोगी ठरतो.

Potassium rich fruits

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Iron rich foods

Tyre expiry date: वाहनांच्या टायरची एक्सपायरी डेट काय असते? जाणून घ्या

Tyre expiry date | saam tv
येथे क्लिक करा