Seasonal Nutrition: सतत पडणाऱ्या पावसात निरोगी राहायचंय? मग आहारात 'या' पौष्टिक पदार्थांचा करा समावेश

Dhanshri Shintre

पौष्टिक पदार्थ

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थ घ्या आणि स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळा.

रोगप्रतिकारक शक्ती

पावसाळ्यात काही खास पदार्थ आहारात घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि आजारांपासून संरक्षण मिळते.

गरम पाणी

पावसाळ्यात जरी आवडत नसले तरी उकळलेले पाणी प्यावे, त्यामुळे आरोग्य चांगले राहते आणि संसर्ग टाळता येतो.

तुळस

तुळस ही प्रभावी आयुर्वेदिक वनस्पती असून, तिचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढते.

गरम पेय

पावसाळ्यात सूप, हर्बल टी किंवा काढा यांचे सेवन केल्याने शरीर मजबूत राहते आणि आजार टाळता येतात.

ताजी फळे

पावसाळ्यात आहारात ताज्या हंगामी फळे आणि भाज्या घालल्याने आरोग्य सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढते.

आले

आल्यातील अँटीऑक्सिडंट घटक सर्दी आणि खोकल्याचे लक्षण कमी करून शरीराला आराम मिळवून देतात.

भाज्या स्वच्छ करा

बाहेरून आणलेली भाजी वापरण्यापूर्वी गरम पाण्याने धुवा, यामुळे जंतू दूर राहतात आणि आजार होण्याचा धोका कमी होतो.

काळीमिरी

पाइपरिन हे घटक आयुर्वेदानुसार आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असून, शरीरातील अनेक विकारांवर सकारात्मक प्रभाव टाकतो.

NEXT: पावसाळ्यात आजार टाळण्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा

येथे क्लिक करा