Surabhi Jayashree Jagdish
साताऱ्यातील लिंगमळा धबधबा हा एक प्रसिद्ध आणि निसर्गरम्य ठिकाण आहे.
महाबळेश्वर आणि पंचगणीच्या मार्गावर असलेला हा धबधबा पर्यटकांसाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
हा धबधबा महाबळेश्वरपासून सुमारे 6 किमी तर पंचगणीपासून सुमारे 12 किमी आहे.
पुणे-सातारा महामार्गावरून महाबळेश्वरकडे जा. महाबळेश्वर-पंचगणी रोडवर लिंगमळा धबधब्याचं फलक दिसेल.तेथून एक छोटा रस्ता जंगलात जातो. यानंतर पायी धबधब्यावर जाऊ शकता.
सर्वात जवळचं स्टेशन सातारा रेल्वे स्टेशन आहे. तिथून टॅक्सी किंवा बसने महाबळेश्वर गाठता येतं.
पुणे, मुंबई, सातारा या ठिकाणाहून एसटी किंवा खासगी बस सेवा उपलब्ध आहे. महाबळेश्वर किंवा पंचगणीत उतरून स्थानिक टॅक्सीने धबधब्याजवळ जाता येतं.
धबधब्यापर्यंत जाण्यासाठी सुमारे 1 किमी जंगल ट्रेक आहे. पायवाट थोडी घसरणीची आणि पावसाळ्यात चिखल असल्यामुळे योग्य शूज घालून जा