Dhanshri Shintre
वास्तुशास्त्रानुसार, तुळशीच्या जवळ हळद ठेवल्याने घरात लक्ष्मीचे वास राहते आणि समृद्धी वाढते, असं मानलं जातं.
तुळशीजवळ पितळी भांड्यात पाणी ठेवले असता घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि वातावरण शुभ बनते, असे मानले जाते.
तुळशीखाली गोमती चक्र ठेवले असता नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि अज्ञात भीतीपासून संरक्षण मिळते, असे वास्तुशास्त्र सांगते.
आठवड्यातून एकदा तुळशीला कच्चे दूध अर्पण केल्यास घरात शांतता, सकारात्मकता आणि सुख-समृद्धी नांदते, असे मानले जाते.
तुळशीच्या झाडाभोवती लाल धागा बांधल्याने नकारात्मकता दूर होते, मनोबल वाढते आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात, असे मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार, तुळशीजवळ नेहमी स्वच्छता आणि नीटनेटकेपणा राखा, यामुळेच शुभ परिणाम आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.
संध्याकाळच्या वेळी तुळशीसमोर दिवा लावल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वातावरण शांत व प्रसन्न राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.