Surabhi Jayashree Jagdish
परफ्युम लावल्यानंतर तो जास्त वेळ टिकावा असं सर्वांना वाटतं. मात्र यासाठी त्याची नेमकी पद्धत तुम्हाला माहितीये का?
मनगट, कानामागे, मानेला बाजूला, कोपराच्या आतील भागावर आणि गुडघ्याच्या मागील बाजूला परफ्युम लावल्यास सुगंध जास्त वेळ टिकतो. कारण या ठिकाणी शरीराचे तापमान जास्त असते.
आंघोळीनंतर त्वचा स्वच्छ असताना परफ्युम लावल्यास सुगंध चांगला पसरतो आणि जास्त टिकतो.
बाटली त्वचेपासून साधारण 6-8 इंच अंतरावर ठेवून स्प्रे केल्यास सुगंध समान पसरतो आणि त्वचेवर डाग पडत नाहीत.
परफ्युम लावल्यानंतर मनगट एकमेकांवर घासू नका, कारण त्यामुळे परफ्युमचे कंपोनट्स तुटतात आणि टिकण्याचा कालावधी कमी होतो.
जॅकेट, स्कार्फ किंवा केसांवर हलका स्प्रे केल्यास सुगंध जास्त वेळ दरवळतो, पण थेट पांढऱ्या कपड्यांवर स्प्रे करू नका, डाग पडू शकतात.
परफ्युमसारख्या सुगंधाच्या बॉडी लोशन किंवा डिओसोबत परफ्युम वापरल्यास टिकाव जास्त मिळतो.
खूप जास्त परफ्युम लावल्यास सुगंध उग्र होतो. 2-4 स्प्रे पुरेसे असतात.