Dhanshri Shintre
रवा केसरी, दक्षिण भारतातील एक स्वादिष्ट गोड पदार्थ आहे, जो विशेषतः सणांच्या आणि उत्सवांच्या दिवशी बनवला जातो.
एका जाड तळाच्या भांड्यात २ टेबलस्पून तूप गरम करा, काजू सोनेरी होईपर्यंत तळून स्वच्छ करा त्यात मनुके सुद्धा मिक्स करा.
१ कप रवा घालून तूप चांगले मिसळा. रवा मंद आचेवर कुरकुरीत आणि सुगंधी होईपर्यंत भाजा, तपकिरी होवू देऊ नका.
रवा भाजत असताना, २½ कप पाणी उकळायला ठेवा. दूध किंवा दोन्हीचे मिश्रण वापरू शकता.
पाणी उकळल्यावर ते हळूहळू रव्यावर ओतत राहा, सतत ढवळत रहा आणि आगीचे तापमान मध्यम ठेवा.
पाणी शोषले जाण्यापर्यंत ढवळत शिजवा, नंतर वेलची पावडर, साखर आणि केसरी रंग घालून मिश्रण छान मिक्स करा.
मिश्रण चांगले मिसळून, पॅनमध्ये सुटेपर्यंत शिजवा. झाकण ठेवून २ मिनिटे शिजवून, नंतर सर्व्ह करा.