Korean street toast: मुलांच्या डब्यासाठी हेल्दी आणि टेस्टी खाऊ बनवायचाय? मग तयार करा हा झटपट कोरियन स्ट्रीट टोस्ट

Surabhi Jayashree Jagdish

कोरियन स्ट्रीट टोस्ट

कोरियन स्ट्रीट टोस्ट म्हणजे कोरियन स्ट्रीट फूडमधील अतिशय लोकप्रिय, झटपट तयार होणारा आणि खूपच चविष्ट नाश्ता. यात कोबी, अंडी, ब्रेड, बटर आणि हलकीशी गोड-तिखट चव असते.

कसा तयार कराल?

घरी बनवायलाही खूप सोपा असल्यामुळे काही मिनिटांत गरमागरम स्ट्रीट टोस्ट तयार करता येतो. लहान मुलांच्या डब्यासाठी काही वेगळं करायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

भाज्या कापा

बारीक चिरलेला कोबी, कांदा, गाजर आणि चिमूटभर मीठ एकत्र करा. भाज्यांचं प्रमाण जास्त असलं की टोस्ट जास्त छान लागतो.

अंडी मिसळा

या सर्व चिरलेल्या भाज्यांमध्ये दोन अंडी फोडा. त्यात मिरची पावडर किंवा मिरी पावडर घालून चांगले मिक्स करा. हे मिश्रण थोडे घट्ट आणि पॅनवर सहज पसरवण्यासारखे असावे.

मिश्रण शिजवून घ्या

तवा गरम करून त्यावर थोडं बटर किंवा तेल लावून भाज्यांचे-अंड्याचे मिश्रण शिजवून घ्या. मिश्रण जाडसर पॅनकेकसारखं दिसेल.

ब्रेड भाजून घ्या

दुसऱ्या तव्यावर ब्रेडच्या स्लाइसवर बटर लावून सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. ब्रेड खरपूस भाजला की संपूर्ण टोस्टला सुंदर क्रंच मिळतो.

फिलिंग भरून सॉस लावा

अंड आणि भांज्याचं मिश्रण ब्रेडवर ठेवा. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये थोडी साखर घाला. त्यावर केचप, मेयो किंवा कोरियन चिली सॉस पसरवा. चवीप्रमाणे चीज तुम्ही घालू शकता.

टोस्ट करून सर्व्ह करा

वरून दुसरी ब्रेड स्लाइस ठेवून हलक्या हाताने दाबा. एकदा मधून कट करून गरमागरम सर्व्ह करा. घरच्या घरी तयार केलेला कोरियन स्ट्रीट टोस्ट नाश्ता, डबे किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरतो.

Sangli Tourism: गुलाबी थंडीत फिरायला जायचा प्लान करताय? लांब नको सांगलीतील 'या' ठिकाणी मज्जा घेऊन याच

येथे क्लिक करा