High blood pressure: वाढलेला रक्तदाब कमी करायचाय? हा सोपा १ मार्ग अनेकांना माहिती नसेल

Surabhi Jayashree Jagdish

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी औषधांशिवाय सर्वात सोपा आणि अनेकांना माहिती नसलेला असा एक प्रभावी मार्ग आहे. हा मार्ग म्हणजे पुरेशी झोप. झोपेमुळे शरीराला नैसर्गिक रीसेट मिळतो आणि हृदयावरचा ताण कमी होतो.

sleep and heart health | saam tv

झोप

झोपेत असताना शरीरातील हृदयाची गती नैसर्गिकरीत्या कमी होते. त्यामुळे रक्तदाब आपोआप खाली येतो आणि हृदयावरचा ताण कमी होतो. डॉक्टरांच्या मते, झोप ही कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमसाठी “रीसेट बटण”सारखी काम करते.

hypertension control | saam tv

7 तासांपेक्षा कमी झोपेचा धोका वाढतो

संशोधनानुसार दररोज 7 तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढतो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन (NIH) च्या अहवालानुसार फक्त 1 तास कमी झोप घेतल्यासही हृदयविकाराचा धोका सुमारे 11% ने वाढतो.

natural BP control | saam tv

शरीरातील ताण

दिवसभराचा मानसिक आणि शारीरिक ताण झोपेमुळे कमी होतो. झोपेमुळे शरीर रिलॅक्स होतं आणि मसल्स दुरूस्त होतात. त्यामुळे रक्तदाब स्थिर ठेवण्यास मदत होते.

sleep deprivation risk | saam tv

झोप हार्मोन्सचे संतुलन सुधारते

चांगली झोप शरीरातील कोर्टिसोल हार्मोन कमी करते. त्याच वेळी मेलाटोनिन आणि ADH हार्मोनचं प्रमाण वाढतं. हे हार्मोन्स रक्तवाहिन्यांचं संरक्षण करतात आणि हृदयावरील ताण कमी करतात.

heart attack risk | saam tv

ताण कमी होतो

योग्य झोपेमुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. रक्तवाहिन्या अधिक निरोगी राहतात आणि ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं. यामुळे दीर्घकाळ हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

cardiovascular health | saam tv

डिस्क्लेमर

ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Note | saam tv

Kandivali Tourism: थंडीच्या दिवसात फिरण्याचा प्लान करताय? दूर नकोच, कांदिवलीतील ही ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

Kandivali tourist places
येथे क्लिक करा