Sakshi Sunil Jadhav
वजन कमी करताना सकाळचा नाश्ता सर्वात महत्त्वाचा मानला जातो. तेलकट आणि जड पदार्थ टाळून हलका, पौष्टिक आणि पोटभर खाणे आवश्यक असते. अशा वेळी डाएट पोहे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
डाएट पोहे हे कमी तेलात, भरपूर भाज्या आणि फायबरयुक्त घटकांपासून बनवलेले पोहे असतात. याने वजन कमी करण्यास मदत होते.
पातळ पोहे, कांदा, गाजर, मटार, शेंगदाणे, मोहरी, हळद, हिरवी मिरची, लिंबू, मीठ, कोथिंबीर इ.
वजन कमी करण्यासाठी पोहे बनवताना फक्त 1 चमचा तेल वापरणं पुरेसं असतं.
गाजर, मटार, बीन्स, कॅप्सिकम यांसारख्या भाज्यांमुळे पोह्यांमध्ये फायबर वाढते आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते.
शेंगदाणे पौष्टिक असले तरी जास्त कॅलरीज देतात, त्यामुळे 1 चमच्यापेक्षा जास्त वापर टाळावा.
पोहे जास्त वेळ पाण्यात भिजवू नयेत. फक्त पाणी शिंपडून मऊ करावेत, जेणेकरून पोहे चिकट होणार नाहीत.
सकाळच्या नाश्त्यासाठी डाएट पोहे सर्वोत्तम मानले जातात. यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते.
डाएट पोहे कमी कॅलरीज, जास्त फायबर आणि पोषक तत्वांनी भरलेले असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.