Sakshi Sunil Jadhav
थंडीमुळे केस कोरडे होतात, तुटतात आणि गळतात ही समस्या अनेकांना त्रास देते. अशा वेळी अंडी हा एक सोपा, नैसर्गिक आणि परिणामकारक उपाय ठरू शकतो.
अंड्यातल्या प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि हेल्दी फॅट केसांना पोषण देतात. जाणून घेऊया अंड्याचा योग्य वापर कसा करावा?
अंड्यातल्या प्रोटीनमुळे केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि ते मुळापासून मजबूत होतात.
एक अंडं फेटून ओल्या केसांवर २०–३० मिनिटे लावल्याने केस मऊ आणि मॉइश्चराइज होतात.
अंड्यात २ चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळून मसाज केल्याने केस तुटणं कमी होतं.
अंडं व मधाचा मास्क स्कॅल्प हायड्रेट ठेवतो आणि कोंडा कमी करतो. कोरफडीचा जेल आणि अंडं एकत्र केल्याने केसांची वाढ लवकर होते.
थंडीमुळे होणारा कोरडेपणा कमी करून केसांना नैसर्गिक चमक मिळते.
अंड्यातील हेल्दी फॅटमुळे केस अधिक चमकदार आणि सॉफ्ट होतात. आठवड्यात १ ते २ वेळाच अंड्याचा हेअर मास्क लावावा.
अतिवापर केल्याने केस चिकट आणि जड होऊ शकतात, त्यामुळे प्रमाण पाळणं गरजेचं आहे.