Shraddha Thik
भारतीय आहारात चपाती हा मुख्य आहार आहे. भारतात गव्हापासून तयार करण्यात आलेल्या चपात्या खाल्ल्या जातात.
जेव्हा वजन कमी करण्याची वेळ येते तेव्हा चपाती आणि भात यांसारखे कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ खाणं टाळतात. जेव्हा वजन कमी करण्याची वेळ येते तेव्हा चपाती आणि भात यांसारखे कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ खाणं टाळतात.
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर चपाती खाणं सोडण्याची काही गरज नाही. तुम्ही आहारात गव्हापासून तयार करण्यात आलेल्या चपात्याऐवजी इतर पिठांच्या चपात्यांचा समावेश करू शकता.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही ज्वारीच्या पीठापासून तयार झालेल्या भाकऱ्याचे सेवन करू शकता. हे पीठ ग्लुटेन फ्री असते. यात प्रोटीन्स, कॅल्शियम आणि आयर्न यांसारखी पोषक तत्व असतात. याशिवाय ब्लड शुगर लेव्हलही नियंत्रणात राहते.
बाजरीच्या पीठात अनेक पोषक तत्व असतात. यात फायबर्सचे प्रमाणही भरपूर असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहते. यामुळे ग्लायसेमिक इंडेक्सही कमी होतो आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर बेसनाच्या पीठापासून बनवलेल्या मऊ भाकऱ्या खाऊ शकता. यात प्रोटीन्स आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही नाचणीच्या पिठाचा आहारात समावेश करू शकता. यात फॅट्सचे प्रमाण कमी असते. याव्यतिरिक्त यात फायबर्स, प्रोटीन्स, कॅल्शियमचे प्रमाणही जास्त असते.