Shraddha Thik
उन्हाळा असो की हिवाळा, प्रत्येक ऋतूत नियमित हायड्रेट राहणे महत्त्वाचे असते.
हिवाळ्यात डिहायड्रेशन होऊ नये म्हणून सतत पाणी प्यावे लागतेच, पण थंड पाणी प्यावे की गरम हा मोठा प्रश्न आहे.
हिवाळ्यात थंड पाणी वापरणे हानिकारक नाही, असे आयुर्वेदात नमूद केल्याचे तज्ज्ञ सांगतात.
ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे व ज्यांना लवकर सर्दी होते, अशा लोकांनी थंड पाणी पिणे टाळावे.
कोमट पाणी हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, आणि शरीरात साठलेली चरबी बाहेर पडते आणि शरीर निरोगी राहते. तसे तर कोमट पाणी पिणे हे प्रत्येक ऋतूमध्ये फायदेशीर असते.
गरम पाणी प्यायल्याने त्याची वाफ तोंडात आणि नाकात जाऊ शकते, त्यामुळे सायनसपासून आराम मिळतो आणि डोकेदुखी देखील कमी होते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोमट पाणी प्यायल्याने घसादुखी आणि सूज यापासून आराम मिळतो, सर्दी आणि फ्लूमध्येही ते फायदेशीर आहे.