Dhanshri Shintre
कलिंगडमध्ये ९२ टक्के पाणी असते, त्यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी उत्तम आणि ताजेपणा देणारे फळ ठरते.
संत्र्यात भरपूर व्हिटॅमिन सी असल्यामुळे ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर फळ मानले जाते. दररोज सेवन करणे आरोग्यास उपयुक्त ठरते.
स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक असतात आणि हे फळ खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते व ताजेतवाने वाटते.
केळ्यामध्येही शरीराला थंडावा देणारे घटक असतात, त्यामुळे उन्हाळ्यात ते खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
उन्हाळ्यात द्राक्ष खाणे फायदेशीर ठरते, कारण यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि उष्णतेपासून नैसर्गिक संरक्षण मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.