Raw Mango Food: फक्त पन्हं आणि लोणचं नव्हे! कैरीपासून बनवा 'हे' भन्नाट आणि स्वादिष्ट पदार्थ

Dhanshri Shintre

कैरीचं लोणचं

कैरीपासून तयार केलेले लोणचं जेवणासोबत अप्रतिम लागते आणि ते वर्षभर टिकवून ठेवता येते.

कैरीचा सार

कढीप्रमाणे वाटलेली कैरी आणि मसाले वापरून बनवलेला हा आंबटसर सार भातासोबत खूप चवदार लागतो.

कैरीची चटणी

कैरी, गूळ, लसूण आणि मसाल्यांसह बनवलेली ही चविष्ट चटणी पराठा किंवा भातासोबत छान लागते.

कैरीचा ठेचा

झणझणीत आणि रुचकर, कैरी व मिरच्या घालून केलेला ठेचा कोरड्या भाजीसोबत मस्त लागतो.

कैरीचे पन्हे

उन्हाळ्याच्या दुपारी थंडावा देणारे, कैरीपासून बनवलेले हे पारंपरिक पेय शरीरातील उष्णता कमी करतं.

कैरीचा मुरंबा

गोडसर आणि थोडासा आंबट, गूळ/साखर घालून तयार केलेला कैरीचा मुरंबा पोळीसोबत अप्रतिम लागतो.

कैरीची कोशिंबीर

किसलेली कैरी, मिरची, मीठ व साखर घालून बनवलेली ताजी कोशिंबीर जेवणासोबत चव वाढवते.

कैरी भात

किसलेली कैरी वापरून तुम्ही चविष्ट आंबटसर कैरी भात सहज तयार करू शकता, जो उन्हाळ्यात खास लागतो.

NEXT: नाशपाती खाल्ल्याने कोणते आजार दूर होतात? शरीरासाठी का आहे हे सुपरफ्रूट जाणून घ्या

येथे क्लिक करा