Millets Benefits: पचनशक्ती सुधारायची आहे का? मग भरडधान्य खाण्याचे फायदे जाणून घ्या

Dhanshri Shintre

मिलेट्स

'मिलेट्स' म्हणजेच भरडधान्यांचे उपयोग भारताने जगाला समजावले आहेत. त्यांना आता आपल्याकडे 'श्रीअन्न' असेही नाव देण्यात आले आहे.

अनेक प्रकार

नाचणी, ज्वारी, बाजरी, बार्ली ही धान्ये पोषणमूल्यांनी भरलेली असून, आरोग्य राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

भरडधान्ये

पचनतंत्र बिघडले असेल आणि उपाय निष्फळ ठरत असतील, तर आहारात नाचणी, ज्वारी, कोदो, बाजरीसारखी भरडधान्ये जरूर समाविष्ट करा.

सुपरफूड

मिलेट म्हणजे लहान दाण्यांचे पोषक तृणधान्य, जे 'सुपरफूड' म्हणून ओळखले जाते आणि आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे.

उत्तम पचनसंस्था

भरडधान्यांतील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, आतड्यांची हालचाल नियमित राहते आणि पचनसंस्था बळकट होते, ज्यामुळे आरोग्य सुधारते.

रक्तदाब नियंत्रण आणि हृदय आरोग्य

भरडधान्यांमध्ये मॅग्नेशियम व पोटॅशियम भरपूर असते, जे हृदयासाठी उपयुक्त ठरते आणि नियमित सेवनाने रक्तदाब व हृदयविकाराचा धोका कमी होतो.

मधुमेहींसाठी वरदान

मधुमेहाच्या रुग्णांसाठी भरडधान्य अत्यंत ओळखले जाते, हे लहान दाण्यांचे तृणधान्य असून ते पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असते.

वजन नियंत्रणात मदत

भरडधान्य खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. यात फायबर आणि प्रोटिनचे प्रमाण जास्त असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

हाडे आणि दातांसाठी मजबूत

याव्यतिरिक्त, भरडधान्य शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठीदेखील प्रभावी ठरते. मिलेट खाल्ल्याने दातही मजबूत होतात.

NEXT: उच्च कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवा! कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दररोज 'या' पदार्थांचा समावेश करा

येथे क्लिक करा