Dugarwadi Waterfall: एका दिवसात धबधब्यावर जाऊन भिजायचंय? मग नाशिकजवळचा 'हा' धबधबा ठरेल परफेक्ट

Surabhi Jayashree Jagdish

दुगारवाडी धबधबा

दुगारवाडी धबधबा नाशिकजवळील एक अत्यंत नयनरम्य आणि प्रसिद्ध धबधबा आहे.

आकर्षण

पावसाळ्यात या धबधब्याचं सौंदर्य अधिकच खुलत. फोटोग्राफर्स तसंच ट्रेकर्ससाठी हे ठिकाण आकर्षण ठरतं.

परिसर

धबधब्याच्या आसपासचा परिसर दाट जंगल, डोंगररांगा आणि धुके यामुळे भारावून टाकणारा असतो.

नैसर्गिक धबधबा

दुगारवाडी धबधबा हा एक नैसर्गिक धबधबा असून तो दाट जंगलात आहे. धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा ट्रेक करावा लागतो.

अनुभव

धबधब्याजवळ कुठलीही व्यावसायिक सुविधा नसल्यामुळे तिथे पूर्ण नैसर्गिक अनुभव मिळतो.

कसं जाल?

नाशिक शहरातून त्र्यंबकेश्वरकडे जाणारा मुख्य रस्ता घ्या. त्र्यंबकेश्वर रोडवर सुमारे ३० किलोमीटर अंतरावर दुगारवाडी गाव आहे.

पायी जा

दुगारवाडी गाव गाठल्यानंतर गाडी पार्क करावी लागते. त्यानंतर सुमारे २० ते ३० मिनिटांचा चालत प्रवास करावा लागतो.

अंतर

दुगारवाडी धबधबा नाशिकपासून सुमारे ४० किलोमीटरवर आहे. प्रवासाला साधारणतः एक ते दीड तास लागतो.

Tourist Places Nashik: खंडाळा, महाबळेश्वरही विसराल..! नाशिकजवळच्या 'या' हिल स्टेशन्सला नक्की भेट द्या

Tourist Places Nashik | saam tv
येथे क्लिक करा