Dhanshri Shintre
डिप्रेशनग्रस्त लोक अनेकदा असहाय्यतेची भावना अनुभवतात. अशा वेळी, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करणे उपयुक्त ठरू शकते.
डिप्रेशनमधून सावरायचे असल्यास दररोज किमान ८ तासांची झोप आवश्यक आहे, कारण चांगली झोप मेंदूचे कार्य सुधारते आणि मानसिक संतुलन राखते.
शरीरामध्ये पाण्याची कमतरता आरोग्यासाठी घातक ठरते. तणाव किंवा डिप्रेशनमध्ये असाल, तर दररोज भरपूर पाणी प्यायल्याने मन प्रसन्न राहते.
तणाव दूर ठेवण्यासाठी रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे आवश्यक आहे. यामुळे तुमचे मन शांत आणि उत्साही राहते.
डिप्रेशन दूर ठेवण्यासाठी डार्क चॉकलेट खाणे फायदेशीर ठरते. यामुळे मन शांत राहते आणि तणावाची भावना लवकर कमी होते.
डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते आणि तणाव कमी होऊन तुम्ही अधिक ऊर्जावान वाटता.
तणाव दूर करण्यासाठी विनोदी चित्रपट पाहा. यामुळे मन प्रसन्न होते आणि नकारात्मक विचारांपासून थोडा वेळ का होईना, पण सुटका मिळते.