Dhanshri Shintre
दूधात काळी मिरी मिसळून प्यायल्याने शरीरात अनेक सकारात्मक बदल घडतात. चला जाणून घेऊ या संयोजनाचे फायदे आणि परिणाम कोणते?
निरोगी शरीरासाठी योग्य आहार महत्त्वाचा आहे. त्यामुळे रोजच्या आहारात भरपूर पोषणमूल्य असलेल्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.
दुधात कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि बीर असते, तर काळ्या मिरीत पाइपरिन, मँगनीज आणि व्हिटॅमिन केसारखे पोषक घटक सापडतात.
काळ्या मिरीतील पाइपरिन संयुग वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. दूधात मिसळून प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होण्यास हातभार लागतो.
दुधात कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन बीर, डी, पोटॅशियम आणि फॉस्फरस असतात. त्यात काळी मिरी मिसळल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
दूध आणि काळी मिरीत अँटीबॅक्टेरियल आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवून सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यास मदत करतात.
एक ग्लास कोमट दूधात चिमूटभर काळी मिरी मिसळून प्यायल्याने पचनसंस्था मजबूत होते आणि पोट स्वच्छ राहण्यास मदत मिळते.
दूधात भरपूर कॅल्शियम असते. त्यात काळी मिरी मिसळून प्यायल्याने हाडे मजबूत होतात आणि वजन कमी करण्यातही मदत मिळते.