Dhanshri Shintre
भारत विविधतेने भरलेला देश आहे, जिथे उन्हाळ्यात फिरण्यासाठी अनेक सुंदर आणि आकर्षक ठिकाणे पाहायला मिळतात.
उन्हाळ्यात पर्वतीय भागांत प्रचंड गर्दी होते, त्यामुळे महागाई आणि गर्दीमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी या ठिकाणांना भेट द्या.
अरुणाचल प्रदेशातील झिरो व्हॅली निसर्गसौंदर्य आणि शांततेसाठी ओळखली जाते, येथे हिरवळ आणि थंड वाऱ्याचे आकर्षण आहे.
हिमाचलची पब्बर व्हॅली एक अप्रतिम शांत ठिकाण आहे, जिथे निसर्ग, बागा आणि नदी सौंदर्य खुलवतात.
कौसानीला भारताचे स्वित्झर्लंड मानले जाते, जिथे बर्फाच्छादित हिमालय पर्वतांचे मनोहर दृश्य, शांत वातावरण आणि कमी गर्दी अनुभवता येते.
हिमाचल प्रदेशातील कुल्लूजवळील शोझा गाव शांततेचा अनुभव घेणाऱ्यांसाठी आदर्श आहे. येथे ट्रेकिंग आणि जंगल सफारीची मजा घेता येते.
उत्तराखंडमधील मुनस्यारी हिल स्टेशन शांत वातावरण आणि पंचचुली पर्वताचे सुंदर दृश्य दर्शवते. ट्रेकिंग आणि फोटोग्राफीसाठी हे आदर्श ठिकाण आहे.
उत्तराखंडमधील चोपटा, मिनी स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध, हिरवीगार कुरणं, पाइनची जंगले आणि शांत वातावरणामुळे उन्हाळ्यातील आदर्श ठिकाण आहे.