Surabhi Jayashree Jagdish
क्रॅनबेरीमध्ये प्रोअँथोसायनिडिन नावाचे घटक असतात. जे काही बॅक्टेरियांना मूत्रमार्गात जाण्यापासून रोखतात. त्यामुळे काही लोकांमध्ये वारंवार होणाऱ्या युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका कमी करण्यासाठी क्रॅनबेरीचा उपयोग होऊ शकतो.
लिंबामध्ये सायट्रेट असतं आणि लिंबाचा रस पाण्यात घेणं काही प्रकारच्या किडनी स्टोनची निर्मिती टाळण्यास मदत करू शकतं. काहीवेळा लिंबूपाणी किडनीतील साचलेले ‘टॉक्सिन्स’ बाहेर काढण्यासही मदत करतं.
बीटमध्ये फोलेट, फायबर आणि विविध अँटिऑक्सिडंट घटक असतात, त्यामुळे तो संतुलित आहाराचा पौष्टिक भाग ठरू शकतो. त्यातील नैसर्गिक नायट्रेट्स शरीरातील नायट्रिक ऑक्साइडच्या निर्मितीला हातभार लावू शकतात. ज्याचा रक्तवाहिन्यांच्या कार्याशी संबंध आहे.
सफरचंदामध्ये सोल्युबल फायबर तसंच विविध वनस्पतीजन्य अँटिऑक्सिडंट घटक आढळतात. सफरचंद खाल्ल्याने पचन, रक्तातील साखर आणि हृदयाच्या आरोग्याशी संबंधित काही बाबींना आधार मिळू शकतो.
लसणामध्ये सल्फरयुक्त संयुगं आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असलेले घटक आढळतात. किडनीच्या आरोग्यासाठी आहारातील सोडियमचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं असल्याने जास्त मीठाऐवजी लसूण, मसाले आणि इतर नैसर्गिक चवींचा वापर फायदेशीर ठरू शकतो.
कोबीमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K, फायबर आणि विविध वनस्पतीजन्य घटक असतात. इतर अनेक भाज्यांच्या तुलनेत त्यात पोटॅशियमचं प्रमाण तुलनेने कमी असल्याने योग्य प्रमाणात घेतल्यास ती किडनीसाठी अनुकूल आहाराचा भाग होऊ शकते.
कलिंगडात पाण्याचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे ते शरीराला द्रव मिळवून देणाऱ्या फळांपैकी एक आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन C आणि लाइकोपीनसारखे वनस्पतीजन्य अँटिऑक्सिडंट घटकही असतात. मात्र दीर्घकालीन किडनीचा आजार असलेल्या काही रुग्णांना द्रव किंवा पोटॅशियमचं प्रमाण मर्यादित ठेवावं लागू शकतं.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.