Dhanshri Shintre
उन्हाळ्यात थंडावा देणारी काकडी अनेकांना आवडते, पण काहीवेळी घरात कडवट काकडी येते, जी खाणे नकोसे वाटते.
आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही सहजपणे कडवट काकडी ओळखू शकता आणि टाळू शकता.
कडू काकडी ओळखण्यासाठी तिच्या रंग आणि आकारावर लक्ष ठेवा; गडद रंग आणि लहान, गोलसर काकडी बहुतेकदा कडवट असते.
काकडी खरेदी करताना दोन्ही टोकं तपासा; कोरडी किंवा कडक टोकं असलेली काकडी टाळा, तर थोडा ओलसरपणा ताजेपणाचे लक्षण आहे.
काकडी खरेदी करताना तिचा वास नक्की तपासा, कारण घाणेरड्या किंवा खराब काकडीचा वास नेहमीच विचित्र आणि वेगळा असतो.
काकडी खरेदी करताना हलक्या बोटांनी दाबून तपासा; जर ती मऊ किंवा खूप कडक वाटली, तर ती ताजी नसल्याचे समजावे.
काकडी खरेदी करताना पातळ आणि लहान काकड्या निवडा; त्या अधिक गोडसर, मऊ आणि ताजेतवाने चव देणाऱ्या असतात.