Dhanshri Shintre
आहार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे लोहाची कमी होऊ शकते, ज्यामुळे शरीरात विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो.
शरीर स्वस्थ राखण्यासाठी आहारातील पौष्टिक अन्न महत्त्वाचे आहे, त्यामुळे निरोगी जीवनासाठी संतुलित आहार आवश्यक आहे.
शरीरात लोहाची कमी झाल्यास विविध समस्या उद्भवू शकतात, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यास धोका होऊ शकतो.
लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी होते, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची कमी आणि थकवा, अशक्तपणाची समस्या निर्माण होते.
लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात ऑक्सिजन पुरेसा पोहोचत नाही, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास आणि साधे व्यायामही कठीण होतात.
लोहाची कमतरता केस गळणे आणि नखे कमकुवत होऊन तुटणे यास कारणीभूत ठरते, शरीराच्या सौंदर्यावर परिणाम होतो.
डोळे पिवळट दिसतात
लोहाची कमतरता होणाऱ्यांमध्ये हिमोग्लोबिन कमी होतो, ज्यामुळे नखे, ओठ, त्वचा आणि डोळे पिवळट दिसू लागतात.