Surabhi Jayashree Jagdish
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि विविध अँटीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात आढळतात. व्हिटॅमिन सी शरीरातील लोहाच्या शोषणास मदत करते, त्यामुळे आहारातून लोह मिळवताना आवळ्याचा समावेश उपयुक्त ठरू शकतो.
कढीपत्त्यामध्ये लोह, कॅल्शियम आणि काही जीवनसत्त्वांसह अनेक पोषक घटक आढळतात. तो आहाराचा भाग केल्याने रोजच्या जेवणातून विविध सूक्ष्म पोषक घटक मिळवण्यास मदत होते. कढीपत्ता भाजी, आमटी, चटणी किंवा फोडणीत वापरल्यास त्याचा आहारात सहज समावेश करता येतो.
मेथीच्या दाण्यांमध्ये प्रोटीन, तंतू आणि इतर वनस्पतीजन्य पोषक घटक असतात. नियमित आहारात मेथीचा समावेश केल्याने संतुलित आहारातील पोषक मूल्य वाढण्यास मदत होते. मेथीची भाजी, भिजवलेले दाणे किंवा स्वयंपाकातील मसाला म्हणून त्याचा वापर करता येतो.
पालकासारख्या हिरव्या पालेभाज्या लोह, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि इतर सूक्ष्म पोषक घटकांचा चांगला स्रोत आहेत. शरीरात लोहाची कमतरता असल्यास केस गळण्याची समस्या वाढू शकते. त्यामुळे लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश महत्त्वाचा ठरतो.
नारळामध्ये चरबी, तंतू आणि काही महत्त्वाचे खनिज घटक असतात. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचा वापर करता येतो. ताजं खोबरं मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास आहारात ऊर्जा आणि पौष्टिक चरबीचा समावेश होतो. नारळाचं तेल केसांवर लावल्याने केसांना मऊपणा आणि चमक मिळू शकते.
केसांचा मोठा भाग केराटिन नावाच्या प्रोटीनपासून बनलेला असल्यामुळे रोजच्या आहारात पुरेसं प्रोटीन मिळणं महत्त्वाचं आहे. डाळी, कडधान्ये, दूध, दही, पनीर, अंडी आणि सोयाबीन यांसारख्या पदार्थांतून प्रोटीन मिळू शकतात.
लोह आणि झिंक यांसारखी खनिजं तसंच व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि बायोटिन यांसारखे पोषक घटक शरीराच्या विविध कार्यांसाठी आवश्यक असतात. आहारात कडधान्ये, बिया, सुका मेवा, हिरव्या पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्याने विविध पोषक घटक मिळू शकतात.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.