Shruti Vilas Kadam
१–२ थेंब व्हिटामिन E तेलात १ चमचा गुलाब जल मिसळा. चेहरा स्वच्छ करून हलक्या हाताने मसाज करत लावा आणि रात्रभर ठेवा.
कोरडी व नॉर्मल त्वचेसाठी उत्तम. तेलकट व पिंपल्स असतील तर आठवड्यातून २–३ वेळाच वापरावे.
गुलाब जल त्वचा शांत ठेवते तर व्हिटामिन E त्वचेला आवश्यक पोषण देतो. रात्री लावल्याने त्वचा रिपेअर होण्यास मदत होते.
व्हिटामिन E मुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो. कोरडी त्वचा मऊ आणि नितळ दिसू लागते.
नियमित वापर केल्यास त्वचा फ्रेश, ग्लोइंग आणि निरोगी दिसते.
व्हिटामिन E अँटीऑक्सिडंट असल्याने पिंपल्सचे डाग आणि काळे डाग हळूहळू फिके होतात.
रात्री लावल्याने फाईन लाईन्स आणि सुरकुत्या कमी दिसू लागतात.