Manasvi Choudhary
घट्ट, लांबसडक आणि काळेभोर केस असणे हे प्रत्येक महिला आणि मुलीचे स्वप्न असते. मात्र, आजकालच्या खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, वाढते प्रदूषण, धूळ आणि रासायनिक उत्पादनांचा अतिवापर यामुळे केसांची वाढ खुंटते, केस कोरडे व निर्जीव होतात.
केसांची वाढ आणि दाट होण्यासाठी तम्ही घरच्या घरी केसांची सोप्या पद्धतीने काळजी घेऊ शकता.
केसांसाठी उपाय बनवण्यासाठी तुम्हाला सुती कापड, कांदा, आले, लवंग आणि तिळाचे तेल हे साहित्य घ्यायचे आहे.
सर्वातआधी एक कांदा किसून घ्या त्यात आले देखील तुम्ही किसून घालू शकता.
त्यानंतर एका सुती कापडमध्ये बारीक किसलेला कांदा, आल्याचा किस आणि ७ ते ८ लवंग ठेवा आणि त्याची जुडी बांधा.
एका भांड्यात खोबऱ्याचे किंवा तिळाचे तेल त्यात ही जुडी १ ते २ तास भिजत ठेवा.
तुम्ही ही केस वाढवणारी पोटली केस धुण्यापूर्वी केसांना वापरू शकता. हे लावल्यानंतर तुम्ही हाताच्या बोटांनी केसांचा हलका मसाज करा.
यानंतर सौम्य शॅम्पूने कोमट पाण्याने केस धुवा म्हणजे तुम्हाला फरक दिसून येईल.
केसांना नैसर्गिकरित्या लांब आणि दाट करण्यासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.