Manasvi Choudhary
चेहऱ्यावर पिंपल्स डाग असतील तर तुम्ही संत्र्याच्या उपयोग करू शकता. संत्र्याच्या सालीची पावडर तुम्ही चेहऱ्यासाठी वापरू शकता.
संत्र्याच्या सालीमध्ये नैसर्गिक गुणधर्म असतात त्यातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म त्वचा निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
ज्यांना पिपंल्स आणि काळे डाग आहेत त्यांच्यासाठी संत्र्याची पावडर अधिक फायदेशीर आहे.
संत्र्याची पावडर तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवून चेहऱ्यावर ही लावू शकता. संत्रे सोलून साल स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
त्यानंतर साल 2 ते 3 दिवस उन्हांमध्ये सुकवा. साल पूर्णपणे सुकल्यानंतर ती मिक्सरमध्ये बारीक करा.
पावडर बारीक केल्यानंतर एका स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा.
योग्य प्रकारे पावडर साठवल्यास तुम्ही महिनाभर ही पावडर वापरू शकता.
संत्र्याच्या सालीची पावडर तुम्ही गुलाबपाण्यात मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता.
मध किंवा दही मध्ये संत्र्याची पावडर मिक्स करू लावा यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात.
संत्र्याची पावडर आणि हळद हे देखील मिश्रण मिक्स करून तुम्ही पेस्ट चेहऱ्यावर लावू शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.