Shruti Vilas Kadam
ग्लिसरिन त्वचेत ओलावा टिकवून ठेवते, एलोवेरा जेल त्वचा शांत करते तर गुलाबजल नैसर्गिक टोनरप्रमाणे काम करते. कसं लावायचं: १ चमचा गुलाबजल + ½ चमचा ग्लिसरिन + १ चमचा एलोवेरा जेल मिसळून चेहऱ्यावर लावा. कधी: रात्री झोपण्यापूर्वी.
एलोवेरा आणि गुलाबजलमुळे त्वचेची जळजळ, लालसरपणा कमी होतो.कसं लावायचं: पिंपल्सवर हलक्या हाताने थाप देऊन लावा. कधी: रात्री किंवा चेहरा धुतल्यानंतर.
नियमित वापरामुळे त्वचा फ्रेश दिसते आणि नैसर्गिक चमक येते. कसं लावायचं: कॉटनच्या मदतीने टोनरसारखे लावा.कधी: सकाळी फेसवॉश नंतर.
ग्लिसरिन त्वचेची लवचिकता वाढवते, त्यामुळे एजिंगची लक्षणे कमी होतात. कसं लावायचं: रात्री जाडसर थर लावून ठेवावा. कधी: रोज रात्री.
हा नैसर्गिक उपाय असल्याने साइड इफेक्ट्सचा धोका कमी असतो. कसं लावायचं: आधी हातावर पॅच टेस्ट करा. कधी: दिवसातून १ वेळ पुरेसे.
त्वचा स्मूथ बनल्यामुळे मेकअप नीट बसतो कसं लावायचं: पातळ थर लावून ५ मिनिटे थांबा. कधी: मेकअप करण्यापूर्वी.
कोरड्या त्वचेसाठी फार फायदेशीर असून त्वचा मऊ आणि नितळ बनवतो. कसं लावायचं: स्वच्छ चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. कधी: हिवाळ्यात रोज, उन्हाळ्यात आठवड्यातून ३–४ वेळा.