Vastu Tips: घरात आर्थिक भरभराट हवीय? श्रीमंतीसाठी घरात कराव्यात ‘या’ महत्त्वाच्या सुधारणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आर्थिक अडचणी

खूप मेहनत करूनही पैसे राहत नाहीत, खर्च वाढतो किंवा अनपेक्षित आर्थिक अडचणी उद्भवतात, यामुळे पैसा कमी पडतो.

तिजोरी

वास्तुशास्त्रानुसार, तिजोरीत पैसा न टिकल्यास ती दक्षिण भिंतीवर ठेवून उत्तर दिशेला उघडणे लाभदायक ठरते.

ईशान्य कोपरा

ईशान्य कोपरा पवित्र मानला जातो; येथे माती किंवा जड वस्तू ठेवल्यास ऊर्जा अडते आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात.

शौचालय

ईशान्य किंवा पूर्व दिशेला शौचालय असल्यास पैसा टिकत नाही आणि तणाव वाढतो; उपाय म्हणून पिवळा रंग वापरा आणि दरवाजा नेहमी बंद ठेवा.

सकारात्मक ऊर्जा

मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा येते, त्यामुळे तिथे स्वच्छता ठेवा. तुटकी झाडे, बूट टाळा आणि शुभ चिन्हांनी दरवाजा सजवा.

लक्ष्मीचे प्रतीक

तुळशीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ती पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावा, दिवा लावा, अन्यथा आर्थिक अडचणी उद्भवू शकतात.

तुटलेल्या वस्तू

घरातील तुटलेल्या आणि वापरात नसलेल्या वस्तू नकारात्मक ऊर्जा वाढवतात. त्यामुळे अशा वस्तू लगेच हटवा आणि बेडखालील जागा नेहमी स्वच्छ ठेवा.

NEXT: घरात मनी प्लांट लावताय? पण या दिशेला लावल्यास संपत्ती कमी होण्याचा धोका! जाणून घ्या

येथे क्लिक करा