Dhanshri Shintre
गृहिणींना रोज सकाळच्या नाश्त्यासाठी नवनवीन पदार्थांचा विचार करावा लागतो, काय वेगळं बनवायचं हा प्रश्न असतो.
सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके हवंय? मग मराठवाडा स्टाईल दही-धपाटे नक्की एकदा करून पाहा.
ज्वारीचे पीठ, कणीक, बेसन, कांदा, कोथिंबीर, तीळ, ओवा, जीरे, हळद, तिखट, मीठ, लसूण पेस्ट, दही, पाणी, तेल.
बारीक चिरलेला कांदा-कोथिंबीर घ्या आणि ज्वारी पीठ, कणीक, बेसन एका भांड्यात एकत्र मिसळा चांगले.
दही, लसूण पेस्ट, हळद, तिखट, मीठ, ओवा, तीळ, जीरे, कांदा, कोथिंबीर घालून पीठात मिक्स करा.
गरजेनुसार पाणी घालून पीठ थोडं सैलसर मळा आणि मग त्याचे मध्यम आकाराचे धपाटे तयार करा.
ओल्या कपड्यावर पिठाचा गोळा ठेवून पोळपाटावर हाताने थापत जाडसर धपाटा तयार करा.
तवा गरम करून, मध्यम आचेवर धपाट्यावर तेल टाकून दोन्ही बाजूंनी छान खरपूस शेकून घ्या.
सर्व धपाटे शेकून घ्या आणि गरमागरम दही, लोणचं, तूप किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.