Morning Breakfast: सकाळचा नाश्ता पोषणयुक्त हवाय? हे आरोग्यदायी पदार्थ नक्की ट्राय करा

Dhanshri Shintre

पोषणयुक्त नाश्ता

उर्जादायक आणि पोषणयुक्त नाश्ता घेतल्यास पोट जास्त वेळ भरलेले राहते, त्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि आरोग्य सुधारते.

nutritious breakfast | Freepik

अंडी

अंड्यामध्ये भरपूर प्रथिने असतात, त्यामुळे स्नायू बळकट होतात आणि दिवसभर ऊर्जावान राहण्यास मदत होते.

eggs | Freepik

दही

दही पचनतंत्र सुधारते, कारण त्यामध्ये नैसर्गिक प्राबोयोटिक्स असतात, जे गॅस, अपचन आणि पोटाच्या समस्या कमी करण्यास मदत करतात.

curd | Freepik

ओट्स

ओट्समध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे पचन सुधारते आणि दिवसाची सुरुवात पोषणयुक्त आहाराने करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते.

oats | Freepik

शेंगदाणे

शेंगदाण्यांमध्ये भरपूर चांगले मेद (गुड फॅट) असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात आणि ऊर्जा वाढवतात.

peanuts | Freepik

ओट्स इडली

ओट्सपासून बनवलेली स्टीम इडली नारळाच्या चटणीसोबत खाल्ल्यास हलकी आणि पचनास सोपी असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

oats idli | Freepik

पराठा

ताजे पराठे लोणच्यासोबत नाश्त्यासाठी स्वादिष्ट पर्याय ठरतात, जे पोटभर आणि उर्जादायक आहार म्हणून उपयुक्त आहेत.

paratha | Freepik

कडधान्याचं सलाड

कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि विविध कडधान्यांना चाट मसाला व लिंबाचा रस मिसळून पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ तयार करता येतो.

Broken grain salad | Freepik

NEXT: घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट ‘रताळ्याचे फराळी पॅटीस’, वाचा सोपी रेसिपी

येथे क्लिक करा