Dhanshri Shintre
उपवास म्हटलं की हमखास साबुदाणा खिचडी किंवा वडे खाल्ले जातात, पण यावेळी काहीतरी वेगळं ट्राय करून पाहा.
साबुदाणा खिचडीला पर्याय हवा आहे का? मग उपवासासाठी खास रताळ्याच्या फराळी पॅटीसची रेसिपी आज शिकून घ्या.
रताळ्याच्या फराळी पॅटीससाठी लागणारे साहित्य, उकडलेले रताळे आणि बटाटे, साबुदाणा, शिंगाडा आणि राजगिरा पीठ, ओले नारळ, मिरच्या, आले, दाण्याचा कुट, लिंबू रस, सैंधव मीठ.
उकडलेली रताळी आणि बटाटे मॅश करून त्यात शिंगाडा, राजगिरा आणि थोडेसे साबुदाणा पीठ मिसळा. चवीनुसार मीठ घालून मिश्रण छान मळून घ्या.
खोवलेल्या नारळात मिरच्या, जीरे, आले घालून वाटून घ्या. त्यात मीठ, साखर, लिंबाचा रस आणि दाण्याचा कुट मिसळून स्वादिष्ट सारण तयार करा.
हाताला तेल लावून रताळ्याच्या मिश्रणाची पारी तयार करा, त्यात सारण भरून बंद करा. गोल आकार देऊन पॅटीस साबुदाणा पिठात हलकेच घोळवा.
गरम तेलात सर्व पॅटीस मध्यम आचेवर तळा, जोपर्यंत ते सोनेरी आणि खमंग होत नाहीत.
गरमागरम रताळ्याचे फराळी पॅटीस खोबऱ्याच्या चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा आणि उपवासाच्या जेवणाचा आनंद घ्या.