Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात, घरातील प्रत्येक वस्तूचा थेट संबंध सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेसोबत असतो. त्यापैकीच एक म्हणजे 'घड्याळ'
घड्याळ हे केवळ वेळ पाहण्याचे नाही, तर ते माणसाची चांगली किंवा वाईट वेळ देखील ठरवते. घरात घड्याळ चुकीच्या दिशेला लावल्यास घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि प्रगतीत अडथळे येऊ शकतात.
घरात घड्याळ कोणत्या भिंतीवर आणि कोणत्या दिशेला लावणे सर्वात शुभ मानले जाते हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
वास्तुशास्त्रानुसार घड्याळ लावण्यासाठी पूर्व दिशा ही बेस्ट आहे. या दिशेला घड्याळ लावल्याने घरात सुख- समृदधी येते.
उत्तर दिशेचा स्वामी संपत्तीचे देवता कुबेर मानले जातात. उत्तर दिशेच्या भिंतीवर घड्याळ लावल्यास घरात आर्थिक संपत्ती वाढण्यास मदत होते.
जर पूर्व किंवा उत्तर दिशेला जागा नसेल, तर तुम्ही पश्चिम दिशेच्या भिंतीवरही घड्याळ लावू शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.