Manasvi Choudhary
आपण जेव्हा बाहेरगावी पिकनिकला जाण्याचा प्लॅन करतो, तेव्हा सर्वात आधी हॉटेल बुकिंगची व्यवस्था केली जाते. हॉटेल आधीच बुक करून ठेवल्यामुळे पोहोचल्यानंतर जास्त टेन्शन राहत नाही आणि बाहेर फिरून आल्यानंतर आरामात विश्रांती घेता येते.
मात्र, हॉटेलच्या रूममध्ये लॉग इन करताना किंवा गेल्यानंतर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी रूमची तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अनेक ठिकाणी हॉटेलच्या रूममध्ये छुपे कॅमेरे बसवल्याच्या घटना समोर येतात. जर तुम्हाला हॉटेलच्या रूममध्ये कुठेही छुपा कॅमेरा असल्याचा संशय येत असेल, तर 4 सोप्या ट्रिक्स आणि जागा कोणत्या आहेत त्या माहित करून घ्या.
छुपे कॅमेरे सहसा डोळ्यांनी दिसत नाहीत, तरी खालील महत्त्वाच्या वस्तूंवर लक्ष दिल्यास समजू शकते.
हॉटेलच्या रूममधील लाईट्स, टीव्ही, फॅन्स, एसी (AC), चार्जिंग पॉईंट्स, स्मोक डिटेक्टर्स आणि भिंतीवरील घड्याळ किंवा शोभेच्या डेकोरेशन वस्तू तपासा. यामध्ये अनेकदा लहान-लहान पिनहोेल कॅमेरे लपवलेले असू शकतात.
रूममधील सर्व लाईट्स बंद करून मोबाईलचा फ्लॅश लाईट (Torch) सुरू ठेवा. जर रूममध्ये कुठेही कॅमेऱ्याची लेन्स असेल, तर त्या प्रकाशात कॅमेऱ्याची लेन्स चमकण्याची शक्यता सर्वात जास्त असते.
अनेकदा हॉटेलच्या बाथरूममध्येही छुपे कॅमेरे असण्याची शक्यता असते. त्यामुळे बाथरूममधील गीझर, बेसिनचा आरसा (Mirror), व्हेंटिलेटर आणि शॉवर पाईप किंवा बल्ब होल्डर व्यवस्थित तपासा.
छुपे कॅमेरे अनेकदा रात्रीच्या वेळी रेकॉर्डिंग करण्यासाठी इन्फ्रारेड प्रकाशाचा वापर करतात, जो उघड्या डोळ्यांना दिसत नाही. यासाठी रूममधील लाईट बंद करून मोबाईलचा कॅमेरा सुरू करून संपूर्ण रूम स्कॅन करा; स्क्रीनवर जांभळा किंवा पांढरा प्रकाश चमकताना दिसल्यास तिथे कॅमेरा असू शकतो.
प्रत्येक हॉटेल्समध्ये छुपे कॅमेरे असतात असं नाही तुम्ही स्वत:च्या सुरक्षिततेसाठी याची खात्री करून घेणे महत्वाचे आहे