Shruti Vilas Kadam
सामान्य वेगाने २० मिनिटे चालल्यास साधारण ५० ते १२० कॅलरी खर्च होऊ शकतात. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर दिवसाला २० मिनिटं चालणे फायदेशीर ठरू शकते.
शरीराचे वजन जास्त असल्यास चालताना अधिक कॅलरी खर्च होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या कॅलरी बर्न होण्याचे प्रमाण वेगवेगळे असते.
हळूहळू चालण्यापेक्षा थोड्या वेगाने चालल्यास शरीरातील जास्त एनर्जी लागते. यामुळे जास्त फायदा होतो. पण नेहमी हळूहळू वेग वाढवा.
रोज २० मिनिटे चालल्याने शरीराची हालचाल वाढते आणि कॅलरी खर्च होतात. संतुलित आहारासोबत नियमित चालण्याची सवय ठेवल्यास वजन कमी करणे सोपे जाते.
नियमित चालण्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. तसेच शारीरिक हालचाल वाढल्याने रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
चालण्यामुळे शरीरातील एनर्जी वापरली जाते. रोज २० मिनिटे चालणे आणि संतुलित आहार घेणे यामुळे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होऊ शकते.
दररोज एकाच वेळी २० मिनिटे चालण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला हळू चाला आणि नंतर वेग वाढवा. नियमित चालण्यासोबत पुरेशी झोप आणि संतुलित आहार घेणे देखील महत्वाचे असते.
डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.