Shruti Vilas Kadam
रोज एकच पदार्थ खाल्ल्याने शरीराला लागणारी सर्व पोषक तत्त्वे मिळतीलच असे नाही. त्यामुळे जेवणात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.
रोजच्या जेवणात फळे, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थ कमी असतील, तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जेवताना फळे, भाज्या आणि धान्यांचा समावेश करा.
आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वेगवेगळे पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे. रोज एकच पदार्थ खाल्ल्याने आतड्यांना मिळणाऱ्या पोषक घटक कमी होऊ शकते.
रोज एकच पदार्थ खाल्ल्याने वजन वाढतेच असे नाही. पण, सतत जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाल्ल्यास वजन वाढू शकते. त्यामुळे संतुलित आहार महत्त्वाचा.
शरीराला दिवसभर काम करण्यासाठी एनर्जी लागते. आहारातून पुरेसे पोषण मिळाले नाही, तर थकवा जाणवू शकतो आणि काम करण्याचा उत्साह कमी होऊ शकतो.
शरीराला निरोगी राहण्यासाठी वेगवेगळी जीवनसत्त्वे आवश्यक असतात. रोज एकाच प्रकारचे पदार्थ खाल्ल्याने पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.
रोजच्या जेवणात डाळी, कडधान्ये, हिरव्या भाज्या, फळे, धान्ये आणि ड्रायफ्रूट्स खा. यामुळे शरीराला वेगवेगळी पोषक तत्त्वे मिळतील. आवडीचे पदार्थ कधी तरी खल्ल्याने शरिराला त्रास होत नाही.
डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.