Sleeping Issues : मध्यरात्री अचानक मध्येच उठून चालायला लागता? सावधान! शरीर देतंय 'या' आजाराचा संकेत

Shreya Maskar

रात्री झोपेत चालणे

अनेकांना रात्री झोपेत चालण्याची सवय असते. याकडे सामान्य समस्या समजू नका. लक्षणे वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Sleep walking at night | pinterest

आरोग्य तज्ज्ञ

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री गाढ झोपेत असताना अचानक उठून चालायला लागणे, घरात फिरणे याला झोपेत चालणे (Sleepwalking किंवा Somnambulism) असे म्हणतात. ही झोपेशी संबंधित समस्या आहे.

Health expert | pinterest

झोपेत चालण्याचा विकार

व्यक्ती अर्धवट झोपेत उठून चालते, डोळे उघडे असू शकतात; परंतु आजूबाजूच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव नसते. सकाळी घडलेला प्रकार आठवतही नाही.

Sleep walking disorder | pinterest

मानसिक ताण

तणाव, चिंता, झोपेच्या वेळेतील बदल आणि पुरेशी झोप न मिळणे यामुळे झोपेत चालण्याचा त्रास उद्भवू शकतो.

mental stress | pinterest

स्लीप ॲपनिया

झोपेत श्वास वारंवार थांबणे किंवा श्वास घेण्यास अडथळा येणे यामुळे झोपेची गुणवत्ता बिघडू शकते. मोठ्याने घोरणे, धाप लागून जाग येणे आणि दिवसा खूप झोप येणे ही लक्षणे आहेत.

Sleep apnea | pinterest

उपाय काय?

दररोज नियमित वेळेत झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा. प्रौढांनी साधारण ७–९ तास झोप घेण्याचा प्रयत्न करावा. व्यक्ती झोपेत चालत असल्यास तिला शांतपणे आणि हळुवारपणे अंथरुणाकडे घेऊन जा.

What is the solution? | pinterest

महत्त्वाची काळजी

तुमच्याही घरात अशा झोपेत चालणारी व्यक्ती असेल तर तिच्या सुरक्षिततेसाठी घरातील जिने, खिडक्या आणि दरवाजे नीट ठेवा. वाटेत अडथळे किंवा धारदार वस्तू ठेवू नका, जेणेकरून त्यांना इजा होईल.

important concern | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर देते 'हा' पहिला भयंकर संकेत, ९९% लोकांना माहीतच नसते हे गुप्त लक्षण

Heart Attack | AI PHOTO
येथे क्लिक करा...