Shruti Vilas Kadam
वेळ कमी असला तरी १० मिनिटं चालणं शरीराला सक्रिय ठेवण्यास मदत करू शकतं. विशेषतः व्यस्त दिनचर्येत हा वॉक सहज करता येतो.
थोडा वेळ चालल्याने शरीराची हालचाल वाढते आणि मूड व मानसिक ताजेपणावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. कामाच्या मधल्या ब्रेकमध्ये छोटा वॉक उपयोगी ठरतो.
जेवणानंतर थोडं चालल्याने रक्तातील साखरेची वाढ नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे जेवणानंतर हलका वॉक करण्याची सवय फायदेशीर ठरू शकते.
दीर्घकाळ चालल्याने हृदय आणि फुफ्फुसांना अधिक वेळ काम करावं लागतं. नियमित ३० ते ६० मिनिटांचा वॉक सहनशक्ती आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
६० मिनिटांचा वॉक अधिक फॅट बर्न करण्यास मदत करू शकतो. त्यामुळे वजन कमी सलग चालतं राहणं गरजेचं आहे.
दिवसभरात १०-१५ मिनिटांचे वॉक केल्याने एकूण शारीरिक हालचाल वाढवता येते. त्यामुळे व्यस्त वेळापत्रक असणाऱ्यांसाठी हा पर्याय सोयीचा ठरतो.
सुरुवात करणाऱ्यांसाठी १० मिनिटांचा वॉक चांगली सुरुवात असू शकते, तर फिटनेस, स्टॅमिना किंवा वजन नियंत्रणासाठी हळूहळू वेळ वाढववा. नियमितपणा सर्वात महत्त्वाचा आहे.