Shruti Vilas Kadam
जिऱ्यातील काही नैसर्गिक घटक पचनक्रियेला मदत करू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी जिरे भिजवलेलं किंवा उकळलेलं पाणी घेण्याची पद्धत प्रचलित आहे.
जिरे पाणी घेतल्याने गॅस, पोट फुगणे आणि जेवल्यानंतर जाणवणारा जडपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.
बडीशेपमध्ये anethole सारखे घटक असतात. पारंपरिक वापरात ते पोटातील अस्वस्थता, गॅस आणि कळा यासाठी वापरले जाते.
जेवणानंतर पोट फुगणे किंवा जड वाटत असल्यास बडीशेपचं पाणी सौम्य पर्याय मानला जातो. मात्र याच्या परिणामांबाबत थेट वैज्ञानिक पुरावे अजून मर्यादित आहेत.
जिरे किंवा बडीशेपचं पाणी हे वजन कमी करण्याचं जादुई पेय नाही. वजन कमी करण्यासाठी आहार, नियमित हालचाल, झोप आणि एकूण कॅलरी सेवन महत्त्वाचं असतं.
पचन सुधारण्यासाठी सकाळी जिरे पाणी घेण्याची पद्धत सांगितली जाते, तर गॅस किंवा पोट फुगल्यास जेवणानंतर बडीशेपचं पाणी घेता येऊ शकतं.
तुमच्या गरजेनुसार निवड करापचन आणि जडपणासाठी जिरे पाणी, तर गॅस, पोट फुगणे आणि पोटाला सौम्य आरामासाठी बडीशेपचं पाणी असा साधा फरक लक्षात ठेवता येईल.